Friday, March 21, 2008

होलीकोत्सव... शिमगा!

होलीकोत्सव... शिमगा!

फाल्गुन... संवत्सरातील, वर्षाच्या अंतिम मासातील अंतिम उत्सव...


उत्सव... मूळ उद्दिष्ट समाजाचे एकत्रीकरण, समाजाचे व व्यक्तीगत स्वास्थ्य, उन्नत्तीबरोबरच नियम-निकशांची चौकट.


कालप्रवाहात काहीचे उदात्तीकरण, काहींचे सवंग परिवर्तन...


त्यांचे संस्कृती, रूढी, परंपरा, चाली, रिती असे श्रेणीयुक्त वर्गीकरण...


लोकमान्यांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाचे सध्याचे स्वरूप त्याचे उत्तम उदाहरण...


उत्सव... वस्तुतः धार्मिकतेच्या हातात हात घालुन समाज व व्यक्ती मानसिक-भौतिक स्वास्थ्य रक्षणासाठी केलेली, निर्माण झालेली कालचर्या...


होळी, जे त्याज्य त्याचे दहन... ?

हिवाळा संपताना वर्षाऋतूत रूजलेल्या, आता शुष्क झालेल्या वनस्पतीजन्य अथवा अन्य ज्वलनशील पदार्थ, जे पुढील ग्रीष्माच्या अतीऊष्ण कालात त्रासाचे ठरू शकतात (वणवा, तत्सम धोके...) ते गोळा करून त्यांचे दहन ?

गत वर्षातील कटू अनुभवांचा त्याग ?

धुलिवंदन ?

वेगवेगळ्या मातीची, रंगांची नुसती उधळण ? मौजमजा ?


की मातीचिकित्सा, रंगचिकित्सा ?


नक्की काय ? नक्की काय ?


प्रत्येक उत्सव, रूढी, परंपरा, चाली, रिती पुन्हा एकदा नव्या काळाच्या गरजेच्या कसोटींवर घासुन पहाणे गरजेचं नाही वाटत ?


आपण काही, कसलं अंधानुकरण तर नाही ना करत ?


कशाची पट्टी बांधल्ये का आपण डोळ्यावर ?

धर्म, कर्म नक्की कशाची पट्टी ?


प्रश्न ? प्रश्न ? प्रश्न ?